Breaking News

निवृत्तीचा निर्णय गेल मागे घेणार?

सेंट जॉर्ज : वृत्तसंस्था

चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी केली. गेलने या सामन्यात वन डेतील 10 हजार धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण 14वा आणि ब्रायन लारानंतर विंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. जवळपास सहा महिन्यानंतर वन डे संघात परतलेल्या गेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धमाकाच उडवून दिला आहे. त्यामुळेच गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या विचारात आहे.

इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा गेलने केली होती.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply