Breaking News

निसर्गरम्य खोरा बंदर पर्यटनासाठी बंद

प्रवेशद्वाराला कुलूप लावून अधिकारी गायब, स्थानिक कोळी बांधव, पर्यटक नाराज

मुरूड : प्रतिनिधी

पावसाळ्यात खास लाटांचा लांबून आनंद घेण्यासाठी  पर्यटक मोठ्या संख्येने खोरा बंदरात येतात. मात्र या वर्षी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने पर्यकांना खोरा बंदर परिसरात फिरता येत नाही, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक कोळी बांधव नाराजी व्यक्त करीत आहेत. प्रवेशद्वाराचा छोटा दरवाजा खुला ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

ऐतिहासीक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरात नवीन जेटी उभारण्यात आली आहे. या बंदरातून दरवर्षी लाखो पर्यटक जंजिरा किल्ल्यावर जातात. खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने निधी उपलब्ध करून खोरा बंदराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

खोरा बंदर व जेटी परिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. काही वर्षपूर्वी जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी  खोरा बंदरातून जलवाहतूक सुरु करण्यात आली. आता तेथे नवीन जेटीही बांधण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात खास लाटांचा लांबून आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संंख्येने खोरा बंदरात येतात. पण या वर्षी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद केल्यानंतर मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी खोरा बंदरातील जेटीवर जाण्याच्या मार्गवरील प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आहे.त्यामुळे पर्यटकांना खोरा बंदर परिसरात फिरत येत नाही. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही.

खोरा बंदर प्रवेशद्वाराचा किमान छोटा दरवाजा उघडा ठेवण्याची मागणी येथील कोळी बांधव व पर्यटक करीत आहेत.

मी अनेक वर्षे खोरा बंदरात पावसाळ्यात येते व येथील जेटीवरून समुद्रात उसळणार्‍या लाटांचा आनंद घेते. नेहमीप्रमाणे रविवारी येथे आले असता खोरा बंदराच्या गेटला कुलूप लावल्याचे आढळले. खोरा बंदराला असे बंदिस्त करू नये. निदान छोटे गेट तरी उघडावे. पर्यटकांना आनंद घेऊ द्यावा.

-कोमल पारपट्टे, पर्यटक

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply