पनवेल ः रामप्रहर वृत्त
पोलीस खात्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना नुकतेच राज्य पोलीस मुख्यालयात राज्यपालांच्या हस्ते पोलीस मेडलने सन्मानित करण्यात आले. हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक तसेच मुंबई येथे निसार तांबोळी यांनी पोलीस खात्यावरील ठिकाणी अतिशय चांगले काम केले. त्यांनी 20 वर्षे पोलीस खात्यात काम केले आहे. नुकतीच त्यांची नवी मुंबई सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी (सिडको) या पदावर नियुक्ती झाली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper