Breaking News

नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत पनवेलच्या ‘एएसए’चे यश

पनवेल ः वार्ताहर

मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या मुंबई महापौर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशन (एएसए)ने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत या असोसिएशनचे सात स्पर्धक सहभागी झाले होते. नॅशनल चॅम्पियनशिप 2021चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशनचे सात खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये पुरुष 80 किलो वजनी व 35 ते 50 वयोगटात संजय बोराडे यांनी उजवा हात सुवर्णपदक आणि डावा हात रौप्यपदक पटकाविले. 70 किलो वजनी आणि 35 ते 50 वयोगटात संतोष भाटकर यांनी डावा हात सुवर्णपदक जिंकले. 70 किलो वजनी व 18 ते 25 वयोगटात प्रदीप माळी यांनी उजवा हात रौप्य आणि डावा हात कांस्यपदक मिळवले. महिलांच्या 65 किलो वजनी व 25 ते 35 वयोगटात योगिता मिश्रा यांनी डावा हात सुवर्ण, तर पूजा बुलानी उजवा हात सुवर्ण पदक जिंकले. सुमन तिवारी यांनी 70 किलो वजनी व 35 ते 50 वयोगटात रौप्यपदक मिळवले. याच असोसिएशनला 25 ते 35 वय व 70 किलो वजनी गटात उजवा हात सहभाग प्रमाणपत्रदेखील मिळाले तसेच उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून असोसिएशनच्या संतोष भाटकर आणि संजय बोराडे यांनादेखील गौरविण्यात आले. या सर्वांना उदय मोहोड आणि महेंद्र ढोके यांनी मार्गदर्शन केले होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply