नेरळमधील कराटेपटूंचे सुयश

कर्जत : नेरळ येथील बुडाकॉन कराटे असोसिएशनच्या कराटेपटूंनी मुंबई बोरिवली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुयश मिळविले. त्यांचे कौतुक होत आहे.
नेरळ येथील कराटेपटू नाविन्या श्रीकृष्ण डुकरे आणि दक्षता संतोष डुकरे या दोघींनी स्पर्धेत दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके पटकाविली. या कराटेपटूंना बुडोकोन कराटे असोसिएशनच्या कोचकडून मार्गदर्शन मिळत असून यातील एका कराटेपटूचे पालक हे ब्लॅक बेल्टधारक आहेत.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply