कर्जत : बातमीदार
नेरळ मोहचीवाडी येथील रणरागिणी महिला मंडळाच्या वतीने कर्जत तालुक्यातील चार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील तसेच कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी रणरागिणी महिला मंडळाच्या कार्याचा गौरव केला.
रणरागिणी महिला मंडळाने नेरळ येथील शनी मंदिर सभागृहात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यात शेलू येथील युवा पॉवरलिफ्टर अमृता भगत, आरोग्य क्षेत्रातील मनिषा खराटे, प्राथमिक शिक्षिका मनिषा चोणकर आणि पत्रकार ज्योती जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बिनिता घुमरे, जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, माजी तालुका अध्यक्षा सुगंधा भोसले, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मंडळाच्या अध्यक्षा वर्षा बोराडे, सरस्वती चौधरी, विद्या विकास शाळेच्या मुख्याध्यापिका विनया काकडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper