पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे महाआरोग्य शिबिरावेळी केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि राज्य शासनाच्या वतीने नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत महाआरोग्य शिबिर शनिवारी (दि. 20) आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते.
दरम्यान, या शिबिराला आमदार सुनील राणे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंतरोग तपासणी, स्तन आणि गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त आणि हिमोग्लोबिन तपासणी, क्ष-किरण तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. या शिबिराला नागरिकांनाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जि.प. सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, माजी पं.स. सदस्य राज पाटील, भाजप पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, रोशन पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, शांताराम चौधरी, राजा भालेकर, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सुनील पाटील, प्रकाश घाडगे, रोशन पाटील, महेश पाटील, राज पाटील, प्रवीण म्हात्रे, यतिन पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, श्याम भालेकर, राजा भालेकर, उपसरपंच राम पाटील, हनुमान फुलोरे, जयेश पाटील, नितीन मोरे, सुनील दौंड, हेमंत मानकामे, नेरे विभाग प्रमुख विद्याधर चोरघे, अपर्णा पवार, डॉ. आकाश वावेकर, नीलिमा पाटील, वंदना रोडपालकर, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, कल्पना वाघे, भरत काकडे, राजेश्री पाटील, नितीन पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper