उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 8) हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, मानसी तांबोळी, सीमा घरत, गौरी देशपांडे, नाहिदा ठाकूर, हेमलता पाटील, सुमन पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांना हळदीकुंकू देऊन भेट व वस्तू देण्यांत आल्या. या वेळी कांचन राजेश पाटील, संगिता प्रशांत पाटील, अफशा मुकरी, सुजाता कडू, संगिता पवार, अनिता घरत, उरण सामाजिक शैक्षणिक व संसृतिक संस्थेच्या पदाधिकारी, दक्षता समितीच्या सर्व सभासद, बचत गट सदस्या, तृप्ती भोईर, नयना पाटील, कल्याणी दुखंडे, नीलिमा थळी, दीपा शिंदे, सामिया बुबेरे, रोहिणी जाधव, देवयानी घरत, कनिष्का नाईक, जेनिफर जयराज, स्वाती देशमुख, सुवर्णा भोईर, मयुरी ओव्होळ, रेणुका शिंदे, किरण टिके, सिमा डोंगरे, महिला पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper