Breaking News

पंतप्रधानांनीच केला ‘त्या’ निर्णयाचा उलगडा

जागतिक महिला दिनी करणार नारीशक्तीला सलाम!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपण सोशल मीडिया सोडण्याचे सूतोवाच केले होते. ’रविवारपासून सोशल मीडियातून एक्झिट घेण्याचा विचार करतोय’, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला, परंतु आता खुद्द पंतप्रधानांनीच याचा उलगडा केला आहे. त्यामुळे ते सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
येत्या रविवारी अर्थात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासाठी जगाला प्रेरणा देणार्‍या महिला किंवा तुमच्या आयुष्यात प्रेरणेचे स्थान राहिलेल्या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सोबतच शीइन्पायर्सअस हा हॅशटॅगही जोडावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर 53.3 मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 44,597,317 जण त्यांना फॉलो करतात, तर इन्स्टाग्रामवर त्यांचे 35.2 मिलिअन फॉलोअर्स आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply