नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबत शनिवारी होणार्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper