नवी दिल्ली ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणार्या डाटा फर्मच्या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 55 टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वांत वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्व्हेनुसार सुमारे 75 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदींची एकूण स्वीकृती रेटिंग 55 टक्के आहे. जर्मनीच्या लोकप्रिय चांसलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग 24 राहिली, तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. भारतातील सर्व्हेदरम्यान घेण्यात आलेल्या सॅम्पलचा आकार दोन हजार 126 एवढा राहिला आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper