Breaking News

पत्रकार सय्यद अकबर यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांना पत्रकारिता समाजकारण आणी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जयहिंद फाउंडेशनकडून खारघर येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जयहिंद फाउंडेशनने सैनिक हो तुमच्यासाठी संकल्पना राबवून सीमेवर शहीद झालेल्या कुटुंबीयांना मदत करण्याची अनोखी मोहीम देशभरात राबवली आहे. जयहिंद फाउंडेशनतर्फे माधव पाटील, संजय कदम आदी पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, भारताचे संविधान, शहीदगाथा हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी काही पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपले विचार मांडले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply