
सुधागड-पाली : प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र या संघटनेचे पनवेल तालुक्यातील पत्रकार निलेश मोने यांनी आपल्या सहकार्यांसह सक्रिय सहभाग घेऊन या संघटनेचे काम हाती घेतले आहे. पत्रकार सुरक्षा समिती पनवेल तालुकाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोने तर खालापूर तालुका सचिव साबीर शेख यांची पत्रकार विजय कडू व पत्रकार सुरक्षा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष गौसखान पठाण, जिल्हा संघटक आनंद सकपाळ यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे कर्जत तालुकाध्यक्ष विलास श्रीखंडे, खालापूर तालुकाध्यक्ष खलिल सुर्वे, कर्जत तालुका उपाध्यक्ष नरेश जाधव, जयेश जाधव, संतोष सुतार आदी प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper