Breaking News

पनवेलच्या एमसीसीएच सोसायटी मैदानावर शनिवारी दीपोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळीच्या स्वागताप्रित्यर्थ पनवेलमधील एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 18) एमसीसीएच सोसायटीच्या मैदानावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध प्रकाशमय उपक्रमांसह इतिहासप्रेरक व्याख्यान होणार असून पनवेलकरांसाठी हा सांस्कृतिक सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन समारंभाने होणार असून यानंतर आकर्षक फायरवर्क्स आणि लाईट शोद्वारे दीपोत्सवाची रंगत वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर 7 वाजता शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले असून प्रसिद्ध वक्ते सुदर्शन शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देतील.
या कार्यक्रमाचे आयोजक पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, एमसीसीएच सोसायटीचे अध्यक्ष उद्योजक राजू गुप्ते, एमसीसीएच सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव आहेत. दीपोत्सवाच्या निमित्ताने पनवेलकरांसाठी मनोरंजन, इतिहास आणि समाज एकात्मतेचा संगम अनुभवण्याची ही अनोखी संधी आहे. त्यामुळे नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहून दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply