पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि 25:15 या मूलभूत सुविधा विकास योजनेतून 10 लाख निधीतून कोळवाडी गावातील जोडरस्त्याचे डांबरीकरण होत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या वेळी त्यांनी पक्ष वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
या विकासकामाच्या शुभारंभावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, नाथाशेठ आगलावे,मारुती चिखलेकर, सचिन चौधरी, माजी सरपंच बुधाजी मोरवाकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उलवेकर, निलम भोईर, शक्तीकेंद्र प्रमुख दीपक उलवेकर, संतोष आगलावे, भास्कर आगलावे, माजी सदस्य दगडू आगलावे, जनार्दन आगलावे, योगेश आगलावे, सुरेश आगलावे, सोपान आगलावे, माजी सदस्य अंकुश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper