मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील राजीव गांधी उद्यानाचा पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात आला आहे. या पुर्नविकासाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, क्लपतरू सोसायटी 1-2चे अध्यक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर, 3-4चे अध्यक्ष पनीर सेल्वम व कल्पतरू वॉटरफ्रंटचे अध्यक्ष पुरुषोत्तम तळेकर यांच्या हस्ते रविवारी (दि. 7) झाले.
या वेळी माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भार्गव ठाकूर, मनोज आंग्रे, अजिंक्य जाधव, रोहन माने, संजोत शेळके आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper