Breaking News

पनवेलमधील विविध संस्थांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील पूरग्रस्तांसाठी जमा झालेली मदत संभाजी भिडे गुरुजींच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पनवेल, शिवसंग्राम प्रतिष्ठान, पनवेल आणि राजे शिवराय प्रतिष्ठान, पनवेल यांच्यामार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात आली. पनवेल, उरण तालुक्यातील सोमटणे, पळस्पे, शिरढोण, कोन गाव, काळुंद्रे, खांदा कॉलनी, चिरनेर, लोधिवली, डोंगरी (उरण), नवीन पनवेल (सेक्टर 19), पारगाव, ओवळे आशा अनेक वेगवेगळ्या गावांतून सर्वांनी सढळ हस्ते मदत केली होती. ही मदत शनिवारी (दि. 17) कोल्हापूरमधील पूरग्रस्त भेंडवडे गाव या ठिकाणी जवळ जवळ 250 कुटुंबांपर्यंत पोहोचवली.

भेंडवडे गाव हे जवळ जवळ 80 टक्के पाण्याखाली होते. या गावात बर्‍याच घरांची पडझड झाली आहे, तसेच उसाच्या आणि सोयाबीनच्या पिकांची नासाडी झाली आहे. गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यानंतर गावाची पाहणी केली असता सर्वच घरांमध्ये पाणी गेल्याचे दिसून आले, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने बरीच घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यातून आता गाव हळूहळू सावरत आहे. शासनसुद्धा जमेल तशी मदत त्यांना पोहचवत आहे. गावाची साफसफाई प्रशासन व गावकर्‍यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली दिसून आली. गावकर्‍यांनीही आम्हाला योग्यते सर्व सहकार्य केले. गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि श्री. माने यांनी पूरग्रस्त कुटुंबांची यादी करून त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी मदत केली. शेवटी मदतीबद्दल गावकर्‍यांनी सर्वाचे आभार मानले वसरपंचांच्या हस्ते आभाराचे पत्र देण्यात आले, अशी माहिती मदत पोहोचविणार्‍या संस्थांनी दिली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply