Breaking News

पनवेलमध्ये आठ ग्रामपंचायतसाठी पोटनिवडणुका

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका 8 डिसेंबर रोजी पार पडत आहेत. त्यासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी 8 डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजणी 9 डिसेंबर रोजी आहे.

तालुक्यात पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर पनवेलमध्ये पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रणांगण यानिमित्ताने तापणार आहे. कुंडेवहाळसाठी 1, आपटासाठी 1, वाकडीसाठी 1, चिखलेसाठी 1, गव्हाणसाठी 4, वडघरसाठी 1, तरघरसाठी 1, उलवेसाठी 2 जागांवर मतदान होत आहे. आठ ग्रामपंचायतीमध्ये 12 जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अर्ज भरण्याची तारीख 16 ते 21 नोव्हेंबर असून 22 नोव्हेंबर रोजी छाननी केली जाणार आहे, तर अर्ज मागे घेण्याची तारीख 25 नोव्हेंबर आहे. 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply