पनवेल : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. खारघरमध्ये आढळलेल्या रुग्णाची पत्नीही कोरोनाबाधित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 2) सांगण्यात आले. ती मुंबईत एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहे. तिच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही महिला डॉक्टर आणखी कोणाच्या संपर्कात आली आहे का, याची चौकशी सुरू आहे. लोकांनी अफवांना बळी पडू नये तसेच दिवसेंदिवस वाढत असलेला धोका लक्षात घेता आता तरी आपल्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात न घालता घरातच थांबावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
Check Also
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …
RamPrahar – The Panvel Daily Paper