
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला रविवारी (दि. 31) सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी तातडीने बाहेर धाव घेतली तसेच पनवेल महापालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करण्यात आले. जवानांनी शर्तीचे प्रयंत्न करून साधारण एक तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. या लागलेल्या आगीमध्ये घरातील सर्व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक विभागाचे प्रमुख अनिल जाधव यांनी वर्तविला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper