पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि. 8) साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या वतीनेही नारीशक्तीला सलाम करण्यात आला. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि नेहा गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका विद्या गायकवाड, मुग्धा लोंढे, हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, उपायुक्त संध्या बावनकुळे, तेजस्विनी गलांडे, महिला कार्यकर्त्या बिना गोगारी आदी उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रांतील महिलांना गौरविण्यात आले, तसेच सामुदायिक शपथ घेण्यात आली. महापौर व अन्य मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper