पनवेलमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अलिबाग ः प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी (दि. 20) सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 467पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी हा रोजगार मेळावा आहे. या रोजगार मेळाव्यात एसएससी पास, आयटीआय, डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्ट इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती www.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029वर संपर्क साधावा तसेच या विनामूल्य रोजगार मेळाव्यास नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply