Breaking News

पनवेलमध्ये प्रिपेड ऑटो रिक्षा बुथसाठी आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

पनवेल रेल्वेस्थानकावरील रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवर प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ चालविण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वस्तू व इतर प्राथमिक सेवा सुविधा पुरविणार्‍या इच्छुक नोंदणीकृत सेवाभावी संस्था अथवा रिक्षा संघटनांकडून लेखी स्वरूपात होकार कळविण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने पनवेल रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड येथे प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ सुरू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई सीएसएमटीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रिपेड ऑटो रिक्षा योजनेमुळे ऑटो रिक्षा चालक, तसेच प्रवासी या दोघांनाही फायदा होणार आहे. या योजनेमुळे प्रवाशांना सुरक्षित व निश्चित दरामध्ये सेवा उपलब्ध होईल. बुथ उभारणे, प्रिपेड सेवेसाठी संगणक, प्रिंटर, स्टेशनरी, विद्युत बिल, फोन बिल, फर्निचर, टेबल खुर्ची, पाणीपुरवठा, 24 तास सेवा देण्याकरिता किमान कर्मचारी इत्यादी प्राथमिक सेवासुविधा उपलब्ध करून प्रिपेड बुथ चालविण्याकरिता इच्छुक नोंदणीकृत सेवाभावी संस्था अथवा रिक्षा संघटनांकडून लेखी स्वरूपात होकार कळविण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply