Breaking News

पनवेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची शनिवारी बैठक

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध मोर्चा- आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य असे सुमारे 800 प्रतिनिधी उपस्थित राहतील. बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्षांच्या संबोधनाने होईल तर उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप होईल.
बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळविल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजप-शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील. शेतीविषयक प्रस्ताव भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणार्‍या या बैठकीत राजकीय सद्यस्थितीविषयी चर्चा होईल तसेच आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply