Breaking News

पनवेलमध्ये भाज्या झाल्या स्वस्त!

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजीपाल्याच्या दराने महागाईचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. मात्र थंडीची चाहूल आणि भाजीपाल्याची वाढती आवक यामुळे भाजीपाला स्वस्त झालेला पहावयास मिळत आहे. पालेभाज्याबरोबरच फळभाज्या देखील स्वस्तच स्वस्त असून यामुळे समाधान व्यक्त होत आहे. पनवेलच्या  बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

सध्या भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दर कमी झाले आहेत. यामुळे बाजारात भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना देखील यामुळे दिलासा मिळाला आहे.

कोंथिबिरी 10 रुपये,  मिरची 25 ते 30 रुपये किलो, मेथीची जुडी 10 रुपये  अशा दरात उपलब्ध असून होलसेल बाजारात मेथीचे दर शेकड्याला 400 ते 500 रुपये असल्याचे दिसून आले. पालक 10 रुपयाला तीन जुड्या, कांदापात 20 रुपयाला पाच ते सहा जुड्या, असा दर आहे. सणासुदीत देखील भाजीपाल्याचे दर अधिक हेते. मात्र दिवाळी होताच शेतातून भाजीमार्केटमध्ये येणारया भाज्यांची आवक वाढली आहे. यामुळे पालेभाज्या अगदी कमी दरात मिळत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply