Breaking News

पनवेलमध्ये भारतमातेचा जयजयकार

भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला भाजपचा सलाम

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली केला गेला. पंतप्रधान मोदी कारवाईच्या वेळी स्वतः अ‍ॅक्शन रूममध्ये हजर होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने कडक पावले उचलत दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. त्याबद्दल पनवेल भाजपने भारतीय वायुसेना, जवानांचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मिठाई वाटून जल्लोष केला. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देण्यात आल्या; तसेच पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देऊन पाकचा निषेधही व्यक्त केला.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply