माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई अनुव्रत समिती तर्फे रायगड विभागाच्या प्रचार प्रवासाचा संघटन दौर्याचा कार्यक्रम मुंबई अध्यक्ष कांचन सोनी, मंत्री वनिताजी बाफना यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलमधील तेरापंथ भवन रविवारी (दि. 21) झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, रायगडच्या सर्व भागातून पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 30 मुलांचा अंतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अंतिम विजेते ठरलेल्या विजेत्यांना न्यायाधीश अधिवक्ता शिवानी कोठारी, शिक्षिका संगीता कोठारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी मुंबई महिला मंडळ मंत्री अलका मेहता, मंत्री वनिता बाफना, रोटरीच्या डॉ. स्वाती लिखे, उपासिका शारदा मेहता, मुंबई उपाध्यक्ष डॉ. विजयसिंग संचेती, तारादेवी चौधरी, मूर्तिपूजक समाजाचे प्रमुख मोतीलाल जैन, रायगडचे संयोजक राजेश मेहता, सहमंत्री प्रियंका सिंघवी, मंजु संचेती, विद्याजी सोनी, मुंबई सभेचे सहमंत्री राजेंद्र रांका, खारघर सभेचे अध्यक्ष सुरेश पटवारी, मंत्री कुंदन मेहता, टीयूपीचे अध्यक्ष शैलेंद्र सोनी, मंत्री शैलेंद्र पटवारी, रवी बाफना, अंकित चौधरी, आदी उपस्थित होते.
महिला मंडळ समन्वयक टीना संचेती, ज्येष्ठ श्रावक लक्ष्मीलाल चंडालिया, अशोक चंडालिया, पद्मजी चोरडिया, पन्नालाल बाफना, संजय जैन, ललिता बंब, संगीता कोठारी, भारती बाफना, सरिता धर्मावत, जयेश समर, कमलेश बाफना, दीपा पटवारी, जिग्नेश हिरण, भेरू सोनवणे, कोठरी, कोठरी, दीपेश हिरन, पवन दुग्गड, प्रमिला डांगी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्वागत राजेश मेहता, सुत्रसंचालन सीमा बाबेल यांनी, तर उपस्थितांचे आभार दीपा पटवारी यांनी मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper