Breaking News

पनवेलमध्ये रस्त्याची दुरुस्ती

नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून घेतली आहे. येथील ब्रिज खाली रस्त्यावर भरपूर खड्डे पडले होते. तरी ट्राफिक पोलीस व लक्ष्मी वसाहतमधील नागरिकांनी प्रभाग ‘ड’ समिती नगरसेवक राजू सोनी यांना फोन करून बोलविले व त्यांना रस्त्याच्या खड्ड्यांबाबत माहिती दिली. तातडीने त्यांनी याबाबत पाहणी करून स्वतःची माणसे लावून रातोरात सर्व खड्डे सिमेंट काँक्रेट करून भरून घेतले. त्याबद्दल त्यांना सर्व वाहतूक प्रकारच्या वाहतूकदारांनी ट्रॅफिक पोलिसांनी व लक्ष्मी वसाहत मधील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्या कर्तव्यदक्ष कामाबाबत सगळ्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply