पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील विकासात्मक अनेक कामांचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि. 5) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या वेळी वलप, वाकडी, आंबिवली आणि आकुर्ली येथील कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, एकनाथ देशेकर, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, सरचिटणीस अंकुश पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, नरेश पाटील, आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, चिटणीस यतीन पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, नारायण खाडेकर, हरिश्चंद्र खाडेकर, स्वामी पाटील, किरण पाटील, बाळाराम पाटील, सोपान खाडेकर, सचिन पाटील, अंकुश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, सदाशिव पाटील, जयेंद्र पाटील, संदीप नाईक, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील, मयूर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यांचा विकास निधी आणि पाठपुराव्यातून एमएमआरडीएच्या निधीमधून आकुर्ली गावातील मेन डीपी रोड ते ग्रामपंचायत तसेच हनुमान मंदिरपर्यंत जाणार्या रस्त्याचे उद्घाटन, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून आंबिवली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण, मुख्य रस्ता ते गणपती विसर्जन तलावापर्यंत कच्चा रस्त्याचे काम, आंबिवली मुख्य रस्त्यावरील मोरीचे आरसीसी, अंगणवाडीचे आरसीसी बांधकाम, मुख्य रस्ता ते सील आश्रम काँक्रीटीकरण, वाकडी आदिवासीवाडीतील अंतर्गत रस्ता आणि वलप येथील एमआयडीसी रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper