Breaking News

पनवेल तालुक्यात आठ नवे रुग्ण

जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधित

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात पाच मुंबईकर चाकरमान्यांसह सात, तर ग्रामीणमध्ये एक असे तालुक्यात बुधवारी (दि. 29) एकूण आठ नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात मुंबईत कार्यरत दोन पोलीस, दोन सफाई कामगार तसेच एक्स-रे टेक्निशियनसह यापूर्वीच पॉझिटीव्ह नातेवाईक असलेल्या दोघांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विचुंबे येथील एकाला कोरोना झाला. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची महापालिका हद्दीतील संख्या 65 आणि तालुक्यातील 76 झाली आहे. दरम्यान, कर्जतमध्ये दोन आणि महाडमध्ये एक असे तीन नवे रुग्ण मिळून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 92वर पोहोचला आहे.
कळंबोली सेक्टर 4 मधील 33 वर्षीय आणि खारघर सेक्टर 12 मधील 38 वर्षीय मुंबईच्या वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अशा दोघांचा  रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. कामोठे सेक्टर 7 मधील 53 वर्षीय आणि  सेक्टर 20 मधील 35 वर्षीय सफाई कामगारा यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दोघेही मुंबई महापालिकेत सफाई कामगार आहेत. खारघर सेक्टर 4 मधील 32 वर्षीय एस्टेट एजंटचा रिपोर्ट आला आहे. त्याच्या भावाचा रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह होता. त्याच्याकडून याला संसर्ग झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. खारघर सेक्टर 4 मधीलच 67 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याचा मुलगा 24 एप्रिलपासून पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत आहे. खारघर येथील मित्र हॉस्पिटलमधील एक्स-रे टेक्निशियन असलेल्या व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तो मूळचा गोवंडीचा असून, रोज गोवंडी-खारघर असा प्रवास करीत होता. विचुंबे हद्दीतील विघ्नेश्वर सोसायटीतील एका ज्येष्ठ नागरिकाचा  रिपोर्ट  पॉझिटीव्ह आला आहे. त्याचा मुलगा मुंबईला महापालिकेत कामाला आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply