पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.16) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 207 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 100 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 127 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल लाईन आळीतील सावंत बिल्डिंग, प्लॉट नंबर 1443, अक्षता अपार्टमेंट, कामोठे सेक्टर 6 पवन सोसायटी आणि खांदा कॉलनी सेक्टर 7, निळकंठ दर्शन येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 33 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2603 झाली आहे. कामोठेमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3407 झाली आहे. खारघरमध्ये 44 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3173 झाली आहे.नवीन पनवेलमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2903 झाली आहे. पनवेलमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2767 झाली आहे. तळोजामध्ये एकही नवीन रुग्ण न आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 689 आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 15542 रुग्ण झाले असून 13046 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.94 टक्के आहे. 2140 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 356 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 19 जणांना लागण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात बुधवारी 19 जणांना कोरोनाची लागण झाली असून 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी दोन, कस्टम चाल मागे भवरा उरण मोरा रोड उरण चार, कोंढरीपाडा, बल्लालेश्वर अपार्टमेंट आनंदनगर, मोरया अपार्टमेंट भैरवनाथ कॉम्प्लेक्स कामठा, वैभव लक्ष्मी सोसायटी, बोरी मोरा, नित्यानंद मंदिर नवघर, चिरनेर मूळपाडा, धाकटी जुई, रानसई, हनुमान मंदिर चाणजे, क्लासिक रेसिडेन्सी बोरीपाखाडी, कोटनाका, मोठी जुई येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1682 झाली आहे. 1382 रुग्ण बरे झाले आहे. 224 रुग्ण उपचार घेत आहेत व 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper