Breaking News

पनवेल तालुक्यात 91 कुष्ठरुग्ण झाले बरे

2021 मध्ये 178 पैकी 64 रुग्णांवर उपचार सुरू

पनवेल ः वार्ताहर

कुष्ठरुग्ण इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला, तरी लवकर निदान आणि योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. 2021 मध्ये पनवेल तालुक्यात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 178 कुष्ठरुग्ण आढळले असून यातील 91 रुग्ण बरे झालेले आहेत.

64 रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते यांनी दिली. 2020 मध्ये तालुक्यात 187 कुष्ठरुग्ण सापडले होते.  त्याचे प्रमाण कमी होऊन 2021 मध्ये 178 कुष्ठरुग्ण आढळले आहेत. कुष्ठरोग निर्मूलनाबाबत जनतेमध्ये जनजागृती झाल्यामुळे जनतेचा कुष्ठरोगी व्यक्तीकडे बघण्यचा दृष्टीकोनही बदलत आहे. कुष्ठरोगाचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. त्वचेवर बधिर चट्टा आल्यास किंवा हातापायास मुंग्या, बधिरपणा आल्यास किंवा त्वचा लालसर चमकदार दिसू लागल्यास त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. रोगाचे निदान झाले, तरी घाबरण्याचे कारण नसते. यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असेही आरोग्य अधिकारी सुनील नखाते यांनी सांगितले.

यावर्षी विशेष मोहीम राबविली आहे. 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झालेली शोधमोहीम मार्च 2022 अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. कर्मचारी रुग्णांचा शोध घेत आहेत.-सुनील नखाते, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply