Breaking News

पनवेल परिसरात काही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली

पनवेल ः वार्ताहर

पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग राखणे जरुरीचे आहे, परंतु लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी बाजारपेठेत काही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना दिसत असल्याने हा आजार त्यामुळे आणखी बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे, दूध, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत, परंतु या वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याने कोरोना संक्रमणाची भीती वर्तविली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी शासनाने लॉकडाऊन जारी केला आहे. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत, परंतु या काळातसुद्धा कोरोनाचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यावर उतरत आहेत. अनेक ठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते, परंतु या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नाही. अशा विनाकारण गर्दी करणारे नागरिक व व्यावसायिकांवर पोलिसांनी तसेच महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply