नगरसेवक मुकीद काझी यांचा पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
नगरसेवक मुकीद काझी व भाजप अल्पसंख्याक युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जवाद काझी यांच्या पाठपुराव्याने येथील प्रभाग क्र. 18 मधील पाणी समस्या मार्गी लागली. त्यामुळे येथील नागरिकांनी मुकीद काझी व जवाद काझी यांचे आभार मानले.
पनवेलच्या प्रभाग क्र.18 पाडा मोहल्ला येथे रविवारपासून पाणी नव्हते. त्यामुळे येथील लोकांनी मुकीद काझी व जवाद काझी यांना या समस्येची माहिती दिली. त्यांनी तत्काळ संबंधित व्यक्ती अविनाश पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनीही चांगला प्रतिसाद दिला. पाणी पुरवठा करणार्या व्यक्तीने अडथळा दूर करीत पाणीपुरवठा सुरळीत करून दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper