पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या सन 2022मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमा रचना सोमवारी (दि. 13) जाहीर करण्यात आली असून त्यावर 24 जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
पनवेल महपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक सन 2022मध्ये होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमा रचना सोमवारी रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये 89 नगरसेवकांसाठी 30 प्रभाग आहेत. त्यापैकी 29 प्रभागांतून प्रत्येकी तीन प्रतिनिधी, तर एका प्रभागातून दोन प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना 24 जून दुपारी 3 वाजेपर्यंत महापालिका आयुक्तांकडे निवडणूक कार्यालयात दाखल करावयाच्या आहेत.
हरकती व सूचना दाखला करणार्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत स्वतंत्र कळविण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचना नकाक्षा, अधिसूचना, प्रभागांची व्याप्ती व चतु:सीमा महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर, महापालिका मुख्यालयात आणि प्रभाग कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper