पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ अमृत महोत्सवात नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सव शनिवारी (दि. 20 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख उपस्थित राहणार आहेत.
पनवेल महापालिकेला स्टार रेटिंगही मिळणार आहे. यापुढेही पालिका क्षेत्र कचरामुक्त राहावे यासाठी शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
महापालिकेला मिळालेल्या पुरस्काराचे सारे श्रेय नागरिकांना आहे. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची जी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे ते नागरिकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण
होऊ शकले नसते.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper