
पनवेल, कामोठे ः देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष जयंत यांनी अभिवादन केले. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, महेंद्र गोजे, दीपक दुर्गे, अशोक आंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper