पनवेल : वार्ताहर
16 वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील पनवेल रेल्वे स्टेशनजवळील आझाद नगर झोपडपट्टी येथे राहणार्या विमल कुमारस्वामी कोंडर यांचा 16 वर्षीय मुलगा आकाश याला राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने काही कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याचा रंग गोरा, उंची 5 फूट 6 इंच असून अंगात जांभळ्या रंगाचा फूल बाह्यांचा टी-शर्ट व चॉकलेटी रंगाची नाईट पँट घातलेली असून केस बारीक असल्याने तो नेहमी टोपी वापरतो. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा सहा. पोलीस निरीक्षक डी. बी. ढुमे यांच्याशी संपर्क साधावा.
RamPrahar – The Panvel Daily Paper