Breaking News

पनवेल शहर पोलिसांकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत; दोन आरोपी गजाआड

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहर पोलिसांनी ठाणे शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा वागळे युनिट-5 च्या मदतीने केलेल्या धडक कारवाईत पनवेल परिसरातील आठ चोरीच्या दुचाकी (किंमत जवळपास 4 लाख 88 हजार 500) हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पनवेल परिसरातून गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने ठाणे शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा वागळे युनिट-5च्या मदतीने व सहकार्याने शिळफाटा येथील नाकाबंदीमध्ये किरण भालेकर (वय 21) व मयुर पाटील (वय 33) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अधिक चौकशीमध्ये पनवेल परिसरातील आठ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply