Breaking News

पनवेल शिवसेनेतही पडली फूट ; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातही शिवसेनेत उभी फूट पडली असून सुमारे चारशे पदाधिकारी व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पनवेल महानगर संघटक व माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी दुपारी रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply