मुंबई ः प्रतिनिधी
राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळी कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स पुन्हा सुरू होणार आहेत.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरेमंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन व्यथा मांडल्या होत्या तसेच व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर शासनाने त्यास परवानगी दिली आहे.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper