Breaking News

पशू विभागाकडून माकडांना खाद्यपदार्थ

रोहे : प्रतिनिधी

रोहा-नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत अनेक माकडांचा कित्येक वर्षांपासून वावर आहे. या मार्गावरून जाणारे वाहनचालक माकडांची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात, मात्र लॉकडाऊनमुळे सध्या येथील वाहने बंद आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील माकडांची खाण्यापिण्याची व्यवस्था रोहा पशू विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

लॉकडाऊनमुळे सर्वत्र भयाण शांतता पसरली आहे. त्यामुळे पशूपक्षी शहराकडे येत आहेत. रोहा तालुक्यात हनुमान टेकडी, जुनी कचेरी, भिसे खिंड व सुकेळी खिंड या ठिकाणी उन्हाळा सुरू झाल्यावर माकडांसह अनेक पक्षी येतात. त्यांना काही पक्षीप्रेमी व खासगी वाहनचालक बिस्किटे, फळे आदी खाद्यपदार्थ तसेच पाणी देतात, मात्र लॉकडाऊनमुळे येथील वाहने बंद झाली आहेत. परिणामी येथील माकडांना

खाद्यपदार्थ मिळत नसल्याने रोहा पशू विभागाचे डॉ. मंदार पटेल, कर्मचारी मनोहर चोरगे, कृष्णा देशमुख हे रोज भिसे खिंडीत जाऊन कलिंगडसह अन्य फळे माकडांना खाण्यास देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना हे पशू अधिकारी-कर्मचारी संवेदना जपत प्राणीसेवेचे मोलाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply