Breaking News

पहिल्या वन डेत विंडीजचा लंकेवर विजय

अ‍ॅटिग्वा ः वृत्तसंस्था

वेस्ट इंडीज संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, उभय संघांतील टी-20 मालिका विंडीज संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना 49 षटकांत सर्वबाद 232 धावांपर्यंत मजल मारता आली. धनुष्का गुणतिलका याने 61 चेंडूंत सर्वाधिक 55 धावा केल्या, तर कर्णधार दिमुख करुणारत्ने (52) आणि एशन बंडारा या दोघांनी (50)देखील अर्धशतक झळकावत योगदान दिले. विंडीजकडून जेसन होल्डर आणि जेसन मोहम्मद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर किएरॉन पोलार्ड, फॅबियन एलन व अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 233 धावांचे लक्ष विंडीज संघाने 18 चेंडू आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर शॉय होपने 133 चेंडूंत 110 धावांची खेळी केली. त्याला एविन लुईसने 65 धावा करीत चांगली साथ दिली. डॅरेन ब्रावोने 47 चेंडूंत नाबाद 37 धावा करीत संघाच्या विजयावर मोहोर लावली. शतकी खेळी करणार्‍या शॉय होपला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघांतील दुसरा सामना 12 मार्चला होणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply