श्रीनगर : सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्ध्वस्त केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात होता. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी यासंदर्भात इशारेसुद्धा दिले होते. अखेर त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने या कारवाईचा व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानला हा मोठा दणका मानला जात आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper