Breaking News

पाटीदार समाजातील महिलांना योजनांविषयी मार्गदर्शन

खारघर : रामप्रहर वृत्त

अटल फाऊंडेशनच्या प्रयत्नाने पाटीदार समाजातील खारघरमधील महिलांना पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना ड्राइविंग, ब्यूटीपार्लर व बेकरी प्रशिक्षण आणि कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या परिवारांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत आदी योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी अटल फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला व बालकल्याण माजी सभापती हर्षदा उपाध्याय, युवा नेते अमर उपाध्याय, कांचन बिर्ला, अंजुबेन पटेल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यांनी फाउंडेशनचे आभार मानले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply