पाली : प्रतिनिधीसिध्दार्थ मित्रमंडळाच्या विद्यमाने शनिवारी (दि. 20) पाबळ येथे बुध्द भिम संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ध्वजारोहण, तसेच बौध्दाचार्य मारुती गोविंद शिंदे यांच्या उपस्थीतीत बुध्द पुजापाठ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून, त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत ह.भ.प महेश पोंगडे महाराज व पत्रकार धम्मशिल सावंत मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ख्यातनाम गायीका शालीनी शिंदे आणि गायक विनोद विद्याधर यांचा गितगायनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंगळाचे हरिश्चंद्र शिंदे व संतोष गायकवाड यांनी दिली.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper