Breaking News

पाय धुवूनच महापालिकेत प्रवेश

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, कोरोनाला पळवून लावण्यासाठी अनेकांना अनेक युक्त्या सुचल्या, काही जण डॉक्टर होऊन उपाय सुचवू लागले आहेत. असेच पनवेल महानगरपालिकामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.पालिकेत येण्यापूर्वी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, तीन प्लास्टिकची भांडी पाण्याने भरून ठेवली आहेत. त्या पाण्यात काही केमिकल (औषधे) असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेत प्रवेश करताना या भांड्यात आपला पाय बुडवायचा आणि पालिकेत प्रवेश करायचा, अन्यथा आपल्याला महापालिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. कारण आपल्या पायातील बूट आणि चपलांना कोरोनाचे विषाणू देखील चिटकलेले असू शकतात आणि त्याच बुटामुळे पालिकेत त्याचा शिरकाव होऊ शकतो अशी शक्कल बहुदा पालिकेने लढवलेली आहे असे दिसून येत आहे. या नवीन युक्तीचे पालिका कर्मचार्‍यांकडून स्वागत देखील केले जात आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply