Breaking News

पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

वित्त व जीवितहानी नाही; सतत हादरे सुरू

पालघर : प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील काही भाग गुरुवारी (दि. 21) सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत गुरुवारी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. याबाबत ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी माहिती दिली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. कोणतेही नुकसान झाल्याची अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असेही त्यांनी सांगितले. नोव्हेंबर 2018पासून वारंवार धुंदलवाडीला भूकंपाचे हादरे बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी या गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.9 इतकी होती.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply