उरण ः रामप्रहर वृत्त
पालवी सामाजिक संस्थेच्या वतीने भेंडखळ येथील श्री ठाणकेश्वर मंदिर परिसर, श्री बहिरीदेव मंदिर परिसर आणि खेळाचे मैदान परिसरात 50 फळवृक्षांची लागवड करण्यात आली.
उरण नगर परिषद सदस्य धनंजय कडवे यांनी नगर परिषदेच्या वतीने पालवी सामाजिक संस्थेस आंबा, फणस, पेरू, चिकू, नारळ, बदाम, आवळा आदी 50 फळझाडे उपलब्ध करून दिली. भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली ठाकूर, उरण नगर परिषद सदस्य धनंजय कडवे, एमआयसीटी प्रबंधक राजेश मयेकर, कामगार प्रतिनिधी लंकेश ठाकूर, प्रांजल भोईर, विशाल ठाकूर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालवी सामाजिक संस्थेचे सचिव विजय भोईर, उपाध्यक्ष लिलेश्वर ठाकूर, अनिल ठाकूर, चंद्रविलास घरत, शैलेंद्र ठाकूर, मिलिंद पाटील, दीपक भोईर, शरद म्हात्रे, सतीश घरत, समीर भोईर, विकास भोईर, प्रगती भोईर, मीलन ठाकूर, पुष्पांजली घरत, आदींनी मेहनत घेतली.
RamPrahar – The Panvel Daily Paper