पाली ः प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या अकराव्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने वरिष्ठ पुरुष 75 ते 80 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 14 क्लबमधील 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग, खजिनदार मुकेश सोनवाणे यांच्या हस्ते झाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper